• Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

  • By: मी Podcaster
  • Podcast

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

By: मी Podcaster
  • Summary

  • A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका
    मी Podcaster
    Show more Show less
Episodes
  • EP 68 - Motivation Vs Actions
    May 30 2024

    भाग ६८

    मोटिवेशनल व्हिडिओस बघून आपण लगेच कामाला लागतो का ?

    मोटिवेशनचा डोस किती वेळ टिकतो ?

    काम करायला, सुरवात करायला मोटिवेशन आवश्यक आहे का ?

    अनुभव असं सांगतो कि मोटिवेशनचा डोस काही वेळात टाय टाय फीस होतो आणि आपण परत जैसे थे होतो.

    Motivation does not cause action, action motivates you to take further action ह्या अमृत देशमुखच्या वाक्यावर ह्या भागात ऊहापोह केला आहे.

    नक्की ऐका.

    Show more Show less
    7 mins
  • EP 67 - Find Your 'Why'
    May 26 2024

    भाग ६७


    Find Your 'Why'


    Apple, Nike, Bose , Old Monk , ह्या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे ?


    ह्या सगळ्यांना एक कल्ट following आहे.


    पण त्यांनी हे कसं केलं ?


    सायमन सिनेक या लेखकाचे ‘स्टार्ट विथ व्हाय हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. त्यात त्याचे म्हणणे आहे, की ‘आपण कुठलीही गोष्ट ‘का’ करतो हे आधी माहिती हवं आणि मग ती कशी करायची हे आपण, आपणहून शोधून काढतो. त्याने बऱ्याच व्यावसायिक संस्थांचे उदाहरण त्यात दिले आहेत, जसे अँपल. अँपलला कल्ट फॉलोइंग आहे. त्याची काय कारणं आहेत याबद्दल विस्तृतपणे पुस्तकात दिले आहे, पण मुख्य मुद्दा हाच आहे की, कुठलंही काम करायच्या आधी आपल्याला आपण ते का करतो आहे, हे माहिती हवं. आपल्याला ‘का’ करायचं हे माहिती असलं की काय आणि कसे हे आपण शोधून काढतो.

    त्याने जी उदाहरणे दिली आहेत, ती सगळी अमेरिकन असल्यामुळे मी आपल्या उदाहरणांना हे लागू होतंय का याचा विचार करून बघितला आणि ते अक्षरशः खरं आहे, असं माझ्या लक्षात आलं. आजच्या भागात त्या बद्दल थोडा ऊहापोह केला आहे.

    Show more Show less
    11 mins
  • EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया
    May 21 2024

    कधी एखादी गोष्ट मनाप्रणारे झाली नाही, अर्धवट राहिली, कोणी धोका दिला, त्रास दिला तर आपण त्याचं विचारात जन्मभर जगतो. सतत बदल्याची भावना मनात असते.


    मधमाश्या ह्या एवढासा जीव, त्यांनी मेहेनतीने बनवलेलं पोळ काही क्षणात कोणीतरी तोडून घेऊन जातं, पण मधमाश्या कधीही मागचा विचार न करता, लगेच परत एकदा नवीन पोळ तयार करायला लागतात. आपण मधमाश्यांकडून हे शिकू शकतो का ?


    झालेली गोष्ट विसरून परत एकदा आपण कमला लागलो तर जास्त फायदा होईल का ? ऐकूया आजच्या भागात




    Show more Show less
    11 mins

What listeners say about Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.